फडणवीस-हर्षवर्धन पाटील भेटीने चर्चेला उधाण

राजकुमार थोरात
शुक्रवार, 26 जुलै 2019

हर्षवर्धन पाटलांच्या मुख्यमंत्री भेटीमुळे तर्क-वितर्कला उधान...

वालचंदनगर : माजी मंत्री व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (ता.३०) रोजी होणार आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी पाटील मुख्यमंत्र्याच्या भेटीला दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्री व हर्षवर्धन पाटलांच्या भेटीमुळे इंदापूर तालुक्यासह राज्यामध्ये तर्क-वितर्कला उधान आले आहे. 

राज्यामध्ये कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप व सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. अनेकांनी पक्षांत्तर ही केले. हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील, मुलगा राजवर्धन पाटील यांच्यासमवेत सहकुंटूब मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने दोघांच्या भेटीच्या चर्चेला उधान आले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्ष मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री पदावरती काम केले असून सहकार, पणन, महिला व बालकल्याण खात्यासह अनेक खात्यांचा कारभार सांभाळला आहे. त्यांना वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आलेल्या अनुभव त्यांनी ‘ विधानगाथा’ पुस्ताकातुन मांडले आहे.याचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मध्यवर्ती सभागृहामध्ये होणार आहे. कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस - हर्षवर्धन पाटील यांची भेटीची चर्चा....
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसची झालेल्या बिघाडीचा सर्वाधिक झटका हर्षवर्धन पाटील यांना बसला. या निवडणूकीमध्ये पाटील यांचा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रेय भरणे यांनी पराभव करुन तालुक्याचे आमदार झाले.गेल्या वर्षी अंथुर्णेमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरीही इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे वक्तव्य  करुन इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण केला आहे.यानंतर अजित पवार यांनी इंदापूरच्या जागेचा निर्णय पवारसाहेब घेतील असे सांगून पवारांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे.

लोकसभेच्या निवडणूकीूमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरच्या सभेत भाषण करताना हर्षवर्धन पाटील साहेब  किती दिवस बारामतीच्या पालख्या उचलणार ? असे वक्तव्य करुन अपत्यक्ष भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र पाटील यांनी लोकसभेच्या निवडणूकीमध्ये आघाडीचा धर्म पाळून खासदार सुप्रिया सुळे यांना तालुुक्यातून ७० हजापेक्षा जास्त मताधिक्य दिले. सध्या इंदापूरमधून आमदार भरणे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्यामुळे आघाडीची जागा कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या राष्ट्रवादी व कॉग्रेसचे अनेक नेते भाजप-सेनेच्या वाटेवरती असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshavardhan Patil may enter in BJP or contest Independent in indapur?