esakal | हर्षवर्धन पाटील घेणार मोठा राजकीय निर्णय; तारीखही ठरली
sakal

बोलून बातमी शोधा

Harshavardhan-Patil-Indapur

इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून करून लढवावी, असा आग्रह इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा असल्याचे दिसून येत आहे.

हर्षवर्धन पाटील घेणार मोठा राजकीय निर्णय; तारीखही ठरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवार (ता.4) दुपारी 1 वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता असल्याने काँग्रेसला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.  

या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुन राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून करून लढवावी, असा आग्रह इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा असल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना लोकसभेला आम्हाला मदत करा, आम्ही विधानसभेची जागा सोडू, असा शब्द दिल्याची चर्चा आहे; परंतु इंदापूर विधानसभेची जागा पाटील यांना सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्त संतप्त आहेत.

लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडण्यासंदर्भात निर्णय घेत नसल्याने इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसुराज्य यात्रेची सभा पूर्वनियोजित नसताना देखील इंदापूर येथे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे इंदापूर तालुक्याचा विकास होण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्ते उघडउघड करत आहेत. त्यातच काँग्रेसने हर्षवर्धन पाटील हे राज्यातील ज्येष्ठ नेते असताना देखील त्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले नाही. याउलट पाटील यांना राजकारणात कनिष्ठ असलेल्या लोकांना राज्यात वरिष्ठ पदे दिली.

तसेच जिल्हा काँग्रेसने पाटील यांची कन्या अंकिता यांना स्थायी समितीचे पद दिले नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या रणनीतीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील या मेळाव्यात घेऊ शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top