आम्हाला नेहमी तलवार भेट दिली जाते पण... : अजित पवार

संपत मोरे
सोमवार, 27 जानेवारी 2020

आम्हाला नेहमी तलवार भेट दिली जाते पण काका पवारांनी गदा भेट दिली आहे. गदा जिंकलेल्या पैलवानांना दिली जाते पण कधीही कुस्ती न खेळलेल्या मला तुम्ही गदा दिली आहे. तुम्ही दिलेली गदा कशी धरावी आणि कुठे ठेवावी  हेच मला कळत नाही. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अशा जोरदार बॅटिंगने कुस्ती शौकिनात हास्यकल्लोळ उडाला.

पुणे- आम्हाला नेहमी तलवार भेट दिली जाते पण काका पवारांनी गदा भेट दिली आहे. गदा जिंकलेल्या पैलवानांना दिली जाते पण कधीही कुस्ती न खेळलेल्या मला तुम्ही गदा दिली आहे. तुम्ही दिलेली गदा कशी धरावी आणि कुठे ठेवावी  हेच मला कळत नाही. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अशा जोरदार बॅटिंगने कुस्ती शौकिनात हास्यकल्लोळ उडाला. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांच्या सत्काराचे निमित्त होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उपमहाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे प्रमुख अर्जुनवीर काका पवार उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार यांचाही गदा देऊन सत्कार करण्यात आला.

विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं

या सत्कार समारंभात अजितदादांनी जोरदारपणे बॅटिंग केली."मी कधीही लंगोट लावली नाही.कुस्ती खेळलो नाही तरीही आपण मला गदा दिली आहे. राजकीय नेत्यांना तलवार भेट दिली जाते आपण मला गदा दिली आहे. ही गदा कशी धरू आणि कुठे ठेवू हेच मला कळेना. गदा पैलवानाच्या खांद्यावर शोभते, असे पवार म्हणाले.

पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा

"आपल्याकडे कुस्तीवर प्रेम करणारी लोक आहेत. पैलवान घडवताना खूप कष्ट करावे लागतात. खूप खर्च करावा लागतो. पैलवान घडत असताना करावी लागणारी मेहनत परिश्रम आपल्याला माहिती आहेत. खेळात जय पराजय होत असतात.परायजाने खचू नये आणि विजयाने हुरळून जाऊ नये.सतत प्रयत्नशील रहा"असा सल्ला यावेळी पवार यांनी उपस्थित मल्लाना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshavardhan Sadgir and Shailesh Kale Greetings from Ajit Pawar