भाजप प्रवेशानंतरही इंदापुरात हर्षवर्धन पाटलांवर उमेदवारीची टांगती तलवार 

सागर आव्हाड
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आज हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असले तरी त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख  रजेंद्र काळे इंदापूर व खडकवासला मिळावा यासाठी आग्रही आहेत. तर, रमेश कोंडे आक्रमक आहेत. तेही मुंबईत ठाण मांडून आहेत.

पुणे : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आज (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करत असले तरी त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे.

महायुतीच्या जागा वाटपात भोसरी व इंदापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेनेलाच मिळावी, याकरीता प्रयत्न सेनेचे उपनेते व जिल्हा प्रमुख काळे व माजी खासदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. जागावाटपात भोसरी ,इंदापूर, जुन्नर, भोर, खडकवासला, बारामती या विधानसभा मतदारसंघ शिवसेना मागण्यांवर ठाम आहे. त्याकरीता आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इंदापूरची जागा ही युतीच्या काळात सेनेकडे होती. त्यामुळे आता ती जागा सेनेला मिळावी ती जागा जर भाजपला देणार असाल तर त्या बदल्यात खडकवसाला मतदार संघ द्यावा, हडपसर मतदारसंघही सेनेने मागितला आहे.

आज हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असले तरी त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख  रजेंद्र काळे इंदापूर व खडकवासला मिळावा यासाठी आग्रही आहेत. तर, रमेश कोंडे आक्रमक आहेत. तेही मुंबईत ठाण मांडून आहेत.

पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे इंदापूर तालुक्‍यातून काँग्रेसचा झेंडा हद्दपार होणार असून, तालुक्‍यात कमळाला अच्छे दिन येण्यास सुरवात होणार आहे. पाटील यांनी 1995 ची विधानसभा निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढून हाताच्या पंजाला हद्दपार केले होते. सन 1999 व 2004 मध्येही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. ते 2004 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. पाटील यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवली व तालुक्‍यात गेल्या 15 वर्षांपासून गायब असलेले पंजाचे चिन्ह दिसू लागले. पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग 19 वर्षे नेतृत्व केले. त्यांनी सहा मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात काम करून इंदापूरचे नाव राज्याच्या राजकारणात झळकविले. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshawardhan Patil candidate ship not confirm in Indapur assembly election