esakal | जनसंकल्प'पूर्वीच हर्षवर्धन पाटलांच्या हातात कमळ !
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंकल्प'पूर्वीच हर्षवर्धन पाटलांच्या हातात कमळ !

हर्षवर्धन पाटील यांनी बोलावलेल्या जनसंकल्प मेळाव्यापर्यंत थांबण्यास कार्यकर्ते तयार नसल्याचे दिसत आहे. कारण, आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पाटील यांचे कमळातले फोटो व्हायरल केले.

जनसंकल्प'पूर्वीच हर्षवर्धन पाटलांच्या हातात कमळ !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भवानीनगर ः हर्षवर्धन पाटील यांनी बोलावलेल्या जनसंकल्प मेळाव्यापर्यंत थांबण्यास कार्यकर्ते तयार नसल्याचे दिसत आहे. कारण, आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पाटील यांचे कमळातले फोटो व्हायरल केले.

कॉंग्रेसच्या वतीने बोलावण्यात आलेल्या सणसर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या बैठकीतील अप्रत्यक्ष सूर हा पाटील यांचा भाजपप्रवेश नक्की हाच होता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील घुसमट व अन्यायाची कुंडली मेळाव्यात मांडून पाटील हे निर्णय जाहीर करतील, असा बैठकीचा सार होता. 
पाटील यांच्या सणसर येथील संपर्क कार्यालयात संकल्प मेळाव्याच्या आयोजनाच्या चर्चेसाठी कार्यकर्त्यांची सोमवारी (ता. 2) बैठक बोलावण्यात आली होती. त्यात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, युवा नेते मयूरसिंह पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

खर्चात कपात करा; पण हातचे काम काढू नका- शरद पवार

कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संतोष चव्हाण, नितीन माने, बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, बाबा निंबाळकर, चंद्रकांत सपकळ, दत्तात्रेय गुप्ते, संभाजी जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत मेळाव्याच्या नियोजनाची चर्चा झाली. मात्र, तालुक्‍याची सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसमधील अन्यायाची कुंडली पाटील वाचून दाखवतील, अशी चर्चा जबाबदार पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केली. 

उदयनराजेंचं ठरलंय !  मावळा मन वळविण्यात अयशस्वी

प्रवेशापूर्वीच कमळावर हर्षवर्धन पाटील 
जनसंकल्प मेळावा बुधवारी असला तरी तत्पूर्वीच "आता बास झालं...आता फक्त सबका साथ सबका विकास' असे लिहीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर कमळाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांचे फोटो व्हायरल करून पाटील यांना समर्थन जाहीर केले. त्याची दिवसभर चर्चा होती. 

loading image
go to top