esakal | उदयनराजेंचं ठरलंय ! मावळा मन वळविण्यात अयशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंचं ठरलंय ! मावळा मन वळविण्यात अयशस्वी

राष्ट्रवादीचे खा.अमोल कोल्हे आणि खा.उदयनराजे भोसले यांच्यात आज (ता.02) सातारा विश्रामगृहात कमराबंद चर्चा झाली. पण, ही चर्चा निष्फळ झाली आहे. मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नसल्याचा निर्वाळा डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

उदयनराजेंचं ठरलंय ! मावळा मन वळविण्यात अयशस्वी

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

सातारा : राष्ट्रवादीचे खा.अमोल कोल्हे आणि खा.उदयनराजे भोसले यांच्यात आज (ता.02) सातारा विश्रामगृहात कमराबंद चर्चा झाली. पण, ही चर्चा निष्फळ झाली आहे. मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नसल्याचा निर्वाळा डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

अजित पवार यांचा पाय आणखी खोलात

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे काही दिवसापासून राष्ट्र्वादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चां रंगू लागल्या आहेत. त्या धर्तीवर आज  डॉ. अमोल कोल्हे  आणि उदयनराजे यांच्यात बैठक झाली. मात्र, उदयनराजेंचे मन वळविण्यात अमोल कोल्हे यांनी अपयश आले असल्याचे दिसत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. मीडियाशी फार काही बोलण्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी मात्र टाळले.

उदयनराजे भाजप सोडून करणार 'या' पक्षात प्रवेश

अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांची बैठक संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी तसे स्पष्टीकरणही दिले. अमोल कोल्हे यांनी मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावरून उदयनराजेंची पुढची दिशा स्पष्ट नसली तरी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार हे आता जवळपास निश्चित झालं असल्याचे या बैठकीनंतर तरी स्पष्ट होत आहे. 

उदयनराजेंसह अन्य नेते काय पोरं आहेत? - चंद्रकांत पाटील

दरम्यान, अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, केवळ सत्ता आहे म्हणून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे हे चुकीचे असल्याचे मतही उदयनराजे यांनी व्यक्त केल्याने उदयनराजे नेमकं काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

सत्ता आहे म्हणून तिकडे जाणे योग्य नाही- उदयनराजे

उदयनराजे नेमका काय निर्णय घेणार?
भाजप प्रवेशाच्या चर्चा येत असतानाच उदयनराजेंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातूनच राजकीय संन्यास घेण्याची भाषा उदयनराजे भोसले यांनी केल्याने उदयनराजे हे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून उदयनराजे नेमका कोणता निर्णय घेणार याविषयी राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

loading image
go to top