esakal | हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : राज्याचे माजी मंत्री तथा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विदयमान अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज गुरुवार दि.२३ सप्टेंबर रोजी इंदापूर प्रशासकीय भवन येथे दाखल केला. इंदापूरचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी हा अर्जस्वीकारला.

कर्मयोगी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा: केंद्राचा मोठा निर्णय; अपंग, असहाय्य लोकांना मिळणार घरपोच लस

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, निरा भीमा कार खान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, संचालक राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, कांतीलाल झगडे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, माऊली बनकर, इंदापूर विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अशोक इजगुडे, शकील सय्यद, महादेव घाडगे, गोरख शिंदे, कैलास कदम, बापू जामदार, रंजना शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा: विक्रमी उंचीवर शेअर मार्केट! 958 अंकांच्या तेजीसह 60,000 चा टप्पा नजीक

दरम्यान निवडणुकीसाठी शुक्रवार दि. २४ सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांचीअर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे.आजपर्यंत हर्षवर्धन पाटील, इंदापूर कृषीउत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, कार खान्याचे विद्यमान संचालक यशवंत वाघ, काँग्रेसचे विष्णू देवकर, शेतकरी संघटनेचे गुलाब फलफले, मदन व्यवहारे आदींनी अर्ज दाखल केले असून १५० उमेदवारी अर्ज इच्छुकांनी नेले असल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top