
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार व कृषी विधेयक लागू केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध मंचर प्रांत कार्यालयासमोर आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.
मंचर (पुणे) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार व कृषी विधेयक लागू केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध मंचर प्रांत कार्यालयासमोर आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद मोदी व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, पुणे जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस अल्लू इनामदार व माजी सरपंच कैलास गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!
अॅड. शुभांगी पोटे, उमेश पांचाळ, महिला अध्यक्ष अर्चना चिखले, ऍड. ताबिश इनामदार आदी आंदोलनात सहभागी झाले होते. राजू इनामदार व अॅड. पोटे यांचे भाषण झाले. कोविड आढावा बैठक सुरू असताना राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रांत सारंग कोडलकर व तहसीलदार रमा जोशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा
कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्याबरोबर असभ्य वर्तन करणारे पोलिस अधिकारी व त्यांना पाठीशी घालणारे जिल्हाधिकारी यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत.
राजू इनामदार, अध्यक्ष, कॉंग्रेस पक्ष आंबेगाव तालुका.