स्टार्टअप व्यावयायिक म्हणातायेत, यशस्वी होण्यासाठी रिस्क घ्यायचीच

Have to take risk to run business said Startup Owner
Have to take risk to run business said Startup Owner
Updated on

पुणे : दोघांचीही नोकरी चांगल्या पद्धतीने सुरू होती. मात्र सामाजिक प्रश्न सोडवणारे स्टार्टअप सुरू करण्याचे पहिल्यापासून आमच्या डोक्यात होते. पण त्यासाठी पुरेसा पैसा नव्हता. मात्र काहीतरी करून दाखवायचे असेल तर रिस्क घ्यावीच लागणार हे मनात ठेवून मित्र संदीप खोडेसह 'वर्डमाया' (wordsmaya) स्टार्टअप सुरू केले. सुरवातीला आलेल्या अडचणींवर मात्र करीत आमचे स्टार्टअप यशस्वी झाल्याचे हर्षद भागवत यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'व्हीटेक मेकॅनिकल इंजिनियर' असलेले भगवान आणि 'मास्टर्स इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग'चे शिक्षण घेतले खोडे यांनी सात ते आठ वर्ष नोकरी केल्यानंतर 2015 साली हे स्टार्टअप सुरू केले.  

संवाद सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यावर आधारित असलेले हे स्टार्टअप राज्यातील अनेक कॉलेज आणि कॉर्पोरेट कंपन्यांना सेवा पुरवत आहे. तिशीच्या घरात आणि नोकरदार असताना आपलं काहीतरी सुरू करण्याची रिस्क घ्यायची का? अशी भीती त्यांच्या मनात होती. मात्र यशस्वी व्हायचं असेल तर रिस्क घ्यायचीच आहे, असे स्टार्टअप सुरु करणाऱ्या 69.2 टक्के व्यावसायिकांचे मत असल्याचे सीआयआयइच्या अहवालाच्यातून समोर आले आहे. स्टार्टअप सुरू करणारी मंडळी कुठल्या वयोगटातील असतात? त्यांचे शिक्षण काय आहे? त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? स्टार्टअप सुरू करताना काही अनुभव त्यांच्या पाठीशी असतो का? रिस्क घेण्यास ते कितपत सक्षम असतात याबाबत सीआयआयइने केलेला अभ्यास या अहवालात मांडण्यात आला आहे.

स्वतःचे भांडवल नसतानाही भरारी : 
स्टार्टअपसाठी नवकल्पनेबरोबर भांडवल देखील गरजेचे असते. मात्र एकूण 59 टक्के उद्योजकांकडे स्वतःचे भांडवल नसतानाही त्यांनी स्टार्टअप सुरू करुन तो यशस्वी झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. 41 टक्के व्यावसायिकांकडे स्वतःचे भांडवल असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सर्व्हेत सहभागी झालेल्या 41 स्टार्टअपला विचारण्यात आलेले प्रश्न

1) स्टार्टअप सुरु करणाऱ्यांचे वय
वय               टक्केवारी
20              32
30              32
40               29
50               05
60               02

2) स्टार्टअप सुरू करणाऱ्यांचे शिक्षण
शिक्षण             टक्केवारी
माध्यमिक            05
पदवी                  51
पदव्युत्तर             44

3) कामगार प्रमुख म्हणुन पूर्वीचा काही अनुभव आहे का? 
होय :    71.08 टक्के
नाही  :  28.02 टक्के

4) स्टार्टअप पूर्वी व्यवस्थापकीय पदावर काम केले आहे का? 
होय : 76.09
नाही : 23.01

5) स्वतः कुठे कामाला होतात का? 
होय : 74.04
नाही : 25.06

6) रिस्क घेण्याची क्षमता :
- यशस्वी होण्यासाठी रिस्क घ्यायची आहे - 69.2 %
- रिस्क घेण्यास काही हरकत नाही -30.8%

 पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​

स्टार्टअप सुरु करणाऱ्या बऱ्याचशा नवउद्योगजकांना व्यावसायात असणाऱ्या अनेक टप्प्यांची कल्पना नसते. स्केलअप होण्याची क्षमता असून सुद्धा अनेकदा यश मिळत नाही. कारण त्यांना उद्योगाचे बारकावे माहीत नसतात. सगळ्या टप्प्यातुन जाऊन ते समजून घेण्यात खूप वेळ वाया जातो. नवोउद्योजकांना त्याचा अंदाज नसल्याने ते निराश होऊन उद्योग सुद्धा सोडतात. या पायऱ्या आधीच कळाल्या व अडचणींची माहिती वेळेतच मिळाली तर जास्त प्रमाणात उद्योग यशस्वी होऊ शकतील. अनेक नवसंशोधक पूर्ण तयारीने या क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त होतील. हा अहवाल त्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे.
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइज (सीआयआयइ) 

...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com