धायरी गणाच्या रिक्त जागेसाठी १२ डिसेंबरला पोटनिवडणूक  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

अधिसूचनेच्या प्रसिद्धीनंतर म्हणजेच २२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या गणातील पंचायत समिती सदस्या अश्विनी पोकळे यांनी राजीनामा देऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात त्या विजयी झाल्या आहेत. यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

पुणे : हवेली पंचायत समितीच्या धायरी गणाची रिक्त जागा भरण्यासाठी येत्या १२ डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना येत्या शुक्रवारी (ता.२२) प्रसिद्ध केली जाणार आहे.

अधिसूचनेच्या प्रसिद्धीनंतर म्हणजेच २२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या गणातील पंचायत समिती सदस्या अश्विनी पोकळे यांनी राजीनामा देऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात त्या विजयी झाल्या आहेत. यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

पोकळे या भाजपच्या उमेदवारीवर पंचायत समितीवर निवडून आल्या होत्या. दरम्यान, धायरी हे गाव आता पुणे महापालिकेत समाविष्ट झाले आहे. मात्र या गणात किरकिटवाडी आणि नांदोशी या आणखी दोन ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे येत्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत या गणाचे नाव धायरी असेच राहणार आहे. गणांच्या नव्या पुर्नरचनेनंतर हे नाव बदलले जाते, असे पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले. या गणात अवघे २७०० मतदार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haveli Panchayat Samiti Bye-election on 2nd December for the vacant lot of dhayari