हवेली तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.८८ टक्के

जनार्दन दांडगे
शनिवार, 9 जून 2018

लोणी काळभोर ता. ०८ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत हवेली तालुक्याचा शेकडा निकाल ९२.८८ टक्के इतका लागला असून तालुक्यातील एकूण १३ शाळांचा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून १२ हजार ६६९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण विद्यार्थ्यांपैकी २ हजार ७७३ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये तर ४ हजार २६१ व ३ हजार ७६७ विद्यार्थी अनुक्रमे प्रथम व द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

लोणी काळभोर ता. ०८ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत हवेली तालुक्याचा शेकडा निकाल ९२.८८ टक्के इतका लागला असून तालुक्यातील एकूण १३ शाळांचा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून १२ हजार ६६९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण विद्यार्थ्यांपैकी २ हजार ७७३ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये तर ४ हजार २६१ व ३ हजार ७६७ विद्यार्थी अनुक्रमे प्रथम व द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

शेकडा निकाल १०० टक्के लागलेल्या शाळांमध्ये उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, एंजल हायस्कूल, कोरेगाव मुळ येथील अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, लोणी काळभोर येथील सेंट तेरेसा हायस्कूल, फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, केसनंद येथील ज्ञानकुमार इंग्लिश मिडीयम स्कूल, वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कूल, देहूगाव येथील जगतगुरु इंग्लिश मिडीयम स्कूल, वाघोली येथील वाघेश्वर इंग्लिश स्कूल, मांगडेवाडी माध्यमिक विद्यालय, किरकटवाडी येथील ज्ञानदा प्रशाला, आंबेगाव येथील श्रीमती कृष्णाई जाधव माध्यमिक विद्यालय व अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा समावेश आहे.      

तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे
महात्मा गांधी विद्यालय (उरुळी कांचन) - ९७.२०, संत तुकाराम विद्यालय (देहू) - ९२.६१, श्री शिवाजी विद्यालय (देहू रोड) - ९४.९१, शिवभूमी विद्यालय (खेड शिवापूर) - ९५.०८, श्री संत तुकाराम विद्यालय (लोहगाव) - ९०.२०, पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल (लोणी काळभोर) - ६८.७२, महात्मा गांधी विद्यालय (खानापूर) - ९१.४७, के. के. घुले विद्यालय, मांजरी बुद्रुक - ९७.५४, न्यू इंग्लिश स्कूल (फुरसुंगी) - ९०.६५, व्ही. एस. सातव विद्यालय (वाघोली) - ९०.४६, डॉ. बसू विद्याधाम (लोणी कंद) - ८७.४०, श्री. वाघेश्वर विद्यालय (चऱ्होली) - ८७.००, श्री. वाघेश्वर विद्यालय (मोशी) - ९२.९८, नवभारत हायस्कूल (शिवणे) - ९२.११, महात्मा ज्योतीराम फुले हायस्कूल (पिसोळी) - ९५.९१, चिंतामणी माध्यमिक विद्यालय (थेऊर) - ७२.१६, समता विद्यालय (उरुळी देवाची) - ९५.४९, कन्या प्रशाला (लोणी काळभोर) - ९०.१७, जनता विद्यालय (पिंपरी सांडस) - ९४.३३, पुरोगामी माध्यमिक विद्यालय (सोरतापवाडी) - ८३.३३ (सेमी इंग्रजी - १००), हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय (फुलगाव) - ९८.८०, ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय (कुंजीरवाडी) - ८६.८१, राधाकृष्ण विद्यालय (पेरणे) - ६९.८१,
संत जिजाबाई कन्या विद्यालय (देहू) - ९७.७०, श्री. भेकाराईमाता माध्यमिक विद्यालय (भेकाराईनगर) - ९१.६९, गर्ल्स हायस्कूल (उत्तमनगर) - ९२.८५, न्यू इंग्लिश स्कूल (अष्टापूर) - ९७.५९, श्री. ज्योगेश्वरी विद्यालय (केसनंद) - ८५.४८, नूतन माध्यमिक विद्यालय (वडकी) - ९६.८२, डॉ. दादा गुजर विद्यालय (महमंदवाडी) - ९०.००, म्हातोबा माध्यमिक विद्यालय (आळंदी म्हातोबाची) - ९८.५५, श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय (आंबेगाव) - ८४.४४, ज्ञानदा प्रशाला (किरकटवाडी) - १००, न्यू इंग्लिश स्कूल (खामगाव, मावळ) - ९५.००, आण्णासाहेब मगर विद्यालय (मांजरी खुर्द) - ७३.१३, एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (कदमवाकवस्ती) - १००, एस. एम. जोशी विद्यालय (महादेवनगर) - ९०.९६, बी. जे. एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (वाघोली) - ९६.९२, धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय (तुळापुर) - ९८.११, कै. अण्णासाहेब गोसावी माध्यमिक विद्यालय (वडगाव शिंदे) - ९४.८७, श्री. सयाजीनाथ महाराज माध्यमिक विद्यालय (वडमुखवाडी) - ९९.३१, न्यू इंग्लिश स्कूल (कोलवडी) - ९८.७६, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय (डोणजे) - ८५.१०, संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय (शिंदवणे) - ९६.९४, नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालय (रुपीनगर) - ९२.८५, प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय (कोंढवा बुद्रुक) - ९७.०९, माध्यमिक विद्यालय (मांगडेवाडी) - १००, जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालय (वाडे बोल्हाई) - ९१.०७, रचना विद्यालय (होळकरवाडी) - ८४.००, अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूट (कोरेगाव मुळ) - १००, सिद्धचलम गुरुकुल (वाडेबोल्हाई) - ९७.१४, यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मिडीयम स्कूल (थेऊर) - ९६.००, अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल (आंबेगाव बुद्रुक) - १००, श्रीमती कृष्णाई जाधव माध्यमिक विद्यालय (आंबेगाव बुद्रुक) - १००, नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल (फुलगाव) - १००, ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय (चिखली) - ८७.२५, दादोजी कोंडदेव विद्यालय (खेड शिवापूर) - ७७.०८, माध्यमिक आश्रमशाळा (वाघोली) - ९६.८७, बबनराव खंडूजी कामठे माध्यमिक विद्यालय (येवलेवाडी) - ७५.००, वाघेश्वर इंग्लिश स्कूल (वाघोली) - १००, सेंट तेरेसा हायस्कूल (लोणी काळभोर स्टेशन) - १००, लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल (फुलगाव) - ९८.३८, लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कूल (वडकी) - १००, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (उरुळी कांचन) - १००, एंजल हायस्कूल (उरुळी कांचन) - १००, जगतगुरु इंग्लिश मिडीयम स्कूल (देहूगाव) - १००, ज्ञानकुमार इंग्लिश मिडीयम स्कूल (केसनंद) - १००.

Web Title: Haveli Taluka's result in Class X results is 2.8 percent