पुणे : पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय सुरू; नियमांची मात्र ऐशीतैशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोणतेही नियमांचे पालन न करता शहरातील बहुसंख्य भागात पथारी व्यावसायिकांनी व्यवसाय करण्यास सुरवात केली असल्याचे बुधवारी शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. दरम्यान शहराच्या काही भागात महापालिकेने व्यवसाय करण्यास परवानगी दिली, तरी त्यासाठी घातलेल्या अटींचे पालन करणे शक्‍य नसल्यामुळे त्यामध्ये बदल करावा, अशी मागणी हातगाडी-पथारी व्यावसायिकांच्या संघटनांनी महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे पथारी व्यावसायिकांमध्ये बुधवारी संभ्रमाचे वातावरण दिसून आले.

पुणे - कोणतेही नियमांचे पालन न करता शहरातील बहुसंख्य भागात पथारी व्यावसायिकांनी व्यवसाय करण्यास सुरवात केली असल्याचे बुधवारी शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. दरम्यान शहराच्या काही भागात महापालिकेने व्यवसाय करण्यास परवानगी दिली, तरी त्यासाठी घातलेल्या अटींचे पालन करणे शक्‍य नसल्यामुळे त्यामध्ये बदल करावा, अशी मागणी हातगाडी-पथारी व्यावसायिकांच्या संघटनांनी महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे पथारी व्यावसायिकांमध्ये बुधवारी संभ्रमाचे वातावरण दिसून आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये शहरातील रेडझोन आणि काही भागातील रस्ते वगळून पथारी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना दोन व्यावसायिकांमध्ये दहा फुटाचे अंतर, मास्क आणि हातमोजे यांचा वापर करणे या व अशा अनेक अटी घातल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र या अटींचे पालन करणे शक्‍य नसल्याचे पथारी व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कोणते व्यवसाय सुरू करावेत, याबाबत परिपत्रकात स्पष्ट म्हटले नाही. त्यातून पथारी व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे जाणीव पथारी, हातगाडीवाले संघटनेचे कार्यवाह संजय शंके यांनी सांगितले. यासंदर्भात महापालिकेला पत्र देऊन काही सूचना संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

पुणे : लॉकडाउनचे नियम शिथिल झाले अन् कोरोनाने दिवसभरात घेतले आतापर्यंतचे सर्वाधिक बळी! 

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात शहराच्या काही भागात पथारी व्यावसायिकांकडून व्यवसाय सुरू करण्यात आले आहे. विशेषतः. भाजी आणि फळे विक्री करणाऱ्यांची संख्या त्यामध्ये मोठी आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या चोरी-छुपे व्यवसाय करीत आहेत. आता महापालिकेने परवानगी दिली असल्याचे कळतात अनेक भागात आज बेकायदेशीरपणे पथारी व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केले असल्याचे आढळून आले आले. विशेषत: उपनगराच्या भागात ही संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले. महापालिकेने व्यवसायासाठी निश्‍चित केलेल्या वेळेपेक्षा पहाटे चार वाजल्यापासूनच सिंहगड रस्त्यावर भाजीचा विक्रेते मोठ्या प्रमाणावर बसत असल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

महापालिकेने परवानगी दिलेले रस्ते 
-शिवाजी रस्ता- पुणे मनपा- डेंगळे पूल- शनिवार वाडा ते जेधे चौक 
-बाजीराव रस्ता- पूरम चौक- माडीवाले कॉलनी, शनिपार चौक, विश्रामबाग वाडा- शनिवार वाडा 
-हडपसर- सोलापूर रस्ता- मगरपट्टा चौक ते गाडीतळ- गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते मनपा हद्दीपर्यंत, गाडीतळ ते फुरसुंगी सासवड रस्ता मनपा हद्दीपर्यंत 
- सातारा रस्ता- जेधे चौक, लक्ष्मीनारायण थिएटर- सिटी प्राइड- विवेकानंद पुतळा- धनकवडी फ्लॉयओव्हर- कात्रज चौक- सातारा रस्ता 
- नगर रस्ता- येरवडा पर्णकुटी- गुंजन चौक- विमाननगर- वडगावशेरी- खराडी बायपास चौक- वाघोली-तैलाची मोरी 
-एअरपोर्ट रस्ता- गुंजन चौक- गोल्फ क्‍लब रस्ता- येरवडा पोस्ट ऑफीस- नागपूर चाळ- जेल रोड पोलिस चौकी- संजय पार्क- एअरपोर्ट 
-सिंहगड रस्ता - दांडेकर पूल- पानमळा- नाकोडा नगर- राजाराम पूल- विठ्ठलवाडी फुटपाथ- संतोष हॉल- आनंदनगर,- माणिकबाग ते वडगाव धायरी उड्डाणपूल ते धायरी शेवटचा बसस्टॉप 
-पौड रस्ता- खंडोजीबाबा चौक- स्वतंत्र चौक- नळस्टॉप- कर्वेरस्ता फ्लॉयओव्हर- आनंदनगर- शास्त्रीनगर- कोथरूड बस डेपो- चांदणी चौक 
-जंगली महाराज रस्ता- संचेती चौक- झाशी राणी चौक-डेक्कन जिमखाना, संभाजी पुतळा- खंडोजीबाबा चौक 
- फर्ग्युसन रस्ता - खंडोजीबाबा चौक- गुडलक चौक- वैशाली हॉटेल- शिवाजीनगर पोलिस स्टेशन 
-गणेश खिंड रस्ता - सिमला ऑफीस चौक- म्हसोबा चौक ते विद्यापीठ चौक- राजभवन- इंदिरा गांधी झोपडपट्टी- औंध- पुणे शहराची हद्द संपेपर्यंत

आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस 

महापालिकेकडून पथारी व्यावसायिकांना घालण्यात आलेल्या अटी 
-दोन पथारी व्यावसायिकांमध्ये 10 मीटरचे अंतर 
-हातमोजे व मास्क घालून विक्री करणे आवश्‍यक 
-व्यवसायाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hawkers business start but rules issue