गवताच्या गंजीला आग लागून पंधरा हजार पेंढ्या जळून खाक

शेतकऱ्याचे सुमारे दिड लाखांचे नुकसान; गंज कोणीतरी पेटवून दिल्याचा संशय
 fire burned straws
fire burned strawssakal

किरकटवाडी : नांदोशी-वांजळवाडी(ता.‌हवेली) गावच्या हद्दीत संतोष हनुमंत ठाकर या तरुण शेतकऱ्याची सुमारे पंधरा हजार गवताच्या पेंढ्या असलेली गंज जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे जवळपास दिड लाख रुपयांचे नुकसान झाले असून कोणीतरी खोडसाळपणा करत गंज पेटवून दिली असल्याचा संशय शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संतोष हनुमंत ठाकर या तरुण शेतकऱ्याचा दुग्धव्यवसाय हे अर्थार्जनाचे मुख्य साधन आहे. त्याच्याकडे लहानमोठी मिळून वीस जणावरे आहेत. उन्हाळ्यात चाऱ्याची सोय व्हावी म्हणून सुमारे पंधरा हजार गवताच्या पेंढ्या संतोषने रचून ठेवल्या होत्या. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या गवताच्या गंजीला आग लागून संपूर्ण गवत जळून खाक झाले आहे.

दुध घालण्यासाठी गेलेल्या संतोषला पत्नीने गवताच्या गंजीला आग लागल्याची माहिती दिली. संतोष माघारी आला परंतु गवत वाळलेले असल्याने व ऊन असल्याने आग विझवणे शक्य झाले नाही. गावातील इतर नागरिकही मदतीसाठी धावले होते परंतु कोणालाही काहीच करण्याची संधी मिळाली नाही. जनावरांसाठी मोठ्या कष्टाने गोळा करुन ठेवलेला चारा डोळ्यांदेखत जळून नष्ट झाला.

गंजीच्या जवळच आहे अवैध दारुचा अड्डा....... गवताची गंज जळाली तेथून अगदी जवळच अवैध गावठी दारू विक्रीचा अड्डा आहे. सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी दारु पिण्यासाठी गर्दी जमलेली असते. कदाचित या दारु पिण्यासाठी आलेल्या कोणीतरी समाजकंटकाने खोडसाळपणा करत गवताची गंज पेटवून दिली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

"कृषी सहाय्यकांना पंचनामा करण्यासाठी तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. शेतकऱ्याला काहीतरी नुकसानभरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील." मारुती साळे, हवेली तालुका कृषी अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com