प्रवाशांनो सावधान! मुंबई-पुणे द्रुतगती प्रवास धोकादायक

ok
सोमवार, 29 जुलै 2019

- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गावर 'शोल्डर लेन' खचली आहे. 
- द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गासही धोका निर्माण झाला आहे.
- लोणावळा,खंडाळ्यासह घाटादरम्यान मोठा पाऊस पडत आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गावर 'शोल्डर लेन' खचली आहे. द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गासही धोका निर्माण झाला आहे. लोणावळा,खंडाळ्यासह घाटादरम्यान मोठा पाऊस पडत आहे.

गेल्या आठवड्यात आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहे. बोरघाटात शेकडो कोटी रुपये खर्च करुनही दरडींचा धोका आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना आडोशी बोगद्यालगत द्रुतगती मार्गालगत शोल्डर लेन दरम्यान मोठी भेग पडली असल्याने मार्गास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आडोशीनजीक काही ठिकाणी द्रुतगती मार्गास तडे गेले आहे. 

आयआरबी कंपनीच्या वतीने तात्पुरती डागडुजी केली असली तरी याठिकाणी वाहनचालकांचे नियंत्रण सुटुन अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गास पडलेल्या फटीमुळे धोका निर्माण झाल्याने याठिकाणची आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hazardous Mumbai-Pune speeding road