...तो अडकला चीनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

उच्चशिक्षणासाठी चीनमधे गेलेला शहरातील एक विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात अडकून पडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्याला परत आणण्यासाठी पाठपुरवठा सुरु असल्याचे समजते.

पिंपरी - उच्चशिक्षणासाठी चीनमधे गेलेला शहरातील एक विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात अडकून पडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्याला परत आणण्यासाठी पाठपुरवठा सुरु असल्याचे समजते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधील हुआन शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सीयागीन भागातील एका सायन्स ऍन्ड टेक्‍नॉलॉजीसंदर्भातील विद्यापीठामध्ये हा विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या भागातील काही विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यास विद्यापीठ प्रशासनाने मनाई केली आहे.

चीनमधील विदेशी नागरिकांची मायदेशी रवानगी

या विद्यार्थ्याला जेवण मिळण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांने आपल्या कुटुंबाशी आणि भारतीय दूतावसाशी संपर्क साधून तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He stuck in China