हेल्थ अँड वेलनेस टुरिझमसाठी परिषद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - हेल्थ ॲण्ड वेलनेस टुरिझममध्ये महाराष्ट्र एक उत्कृष्ट ब्रॅण्ड म्हणून उदयास यावे, या उद्देशाने येत्या ३० तारखेला मुंबईत भागधारकांची एक परिषद होत आहे. शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते, संशोधक, विषय तज्ज्ञ आणि उद्योजक या परिषदेत सहभागी होणार आहेत.  या परिषदेसाठी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि कौशल्य विकास व कामगारमंत्री संभाजीराव पाटील -नीलंगेकर प्रमुख पाहुणे असणार आहेत.

महाराष्ट्रात हेल्थ ॲण्ड वेलनेस टुरिझममध्ये अग्रेसर असलेली पॅंडोझा सोल्यूशन या परिषदेची संयोजक असून, सकाळ माध्यम समूह या परिषदेसाठी माध्यम प्रायोजक आहे. परिषदेमध्ये आखाती आणि सार्क देशांसह, आफ्रिका, जपान, अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि  युरोपातील काही देशांतील प्रतिनिधी, गुंतवणूकदार व खरेदीदार सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राला हेल्थ अँड वेलनेस पर्यटन केंद्र बनविण्यासाठी एमएचडब्ल्यूटीसी प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे ‘महाराष्ट्र हेल्थ अँड वेलनेस परिषद (एमएचडब्ल्यूटीसी) २०१८’ हा जगभरात आरोग्य व स्वास्थ्य पर्यटनातील ब्रॅंड होईल.
- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री, महाराष्ट्र राज्य. 

ही परिषद नक्कीच मोलाची ठरेल. कौशल्य विकासाच्या अंतर्गत मेडिकल टुरिझममध्ये देखील महाराष्ट्रातील तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीत नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. 
- संभाजी पाटील नीलंगेकर, कौशल्य विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य

भारतामध्ये अनुभवी आणि कौशल्यपूर्ण डॉक्‍टर्स आहेत. त्यांचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्राने वैद्यकीय व्यावसायिकांना अशा मोठ्या परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी करून दिल्याबद्दल मला आनंद होत आहे. 
-डॉ. शशांक शहा, संचालक, लॅप्रो-ओबेसी सेंटर

महाराष्ट्र पर्यटन धोरण २०१६ नुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही ‘हेल्थ अँड वेलनेस’ पर्यटन विकासासाठी अनुकूलता निर्माण करण्याकरिता प्रयत्नशील आहोत. 
-विजयकुमार गौतम, प्रधान सचिव, पर्यटन आणि संस्कृती, महाराष्ट्र राज्य

काय : हेल्थ अँड वेलनेस टुरिझम  परिषद
कोठे: ताज लॅन्ड्‌स एन्ड, मुंबई
कधी : शनिवार ३० जून
केव्हा : सकाळी ९
अधिक माहितीसाठी संपर्क : ७७६८००५६७७ किंवा ९९२१४६९१९१

Web Title: health and wellnews tourism conferance