खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

संतोष आटोळे 
सोमवार, 9 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने शिर्सुफळ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार कोकरे, सरपंच अतुल हिवरकर, नवनिर्वाचित सरपंच  आप्पासाहेब आटोळे, अॅड. राजकिरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे, बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर, साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिरसाई विद्यालयातील 5 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिर्सुफळ येथील डाॅक्टर व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शुभम जाधव, शिर्सुफळ शाखेचे उपाध्यक्ष राकेश शिंदे व सुरेश आटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार शुभम जाधव यांनी मानले.

Web Title: health campaign organised on the occasion of mp supriya sule s birthday