आशा, अंगणवाडी सेविकांना हेल्थ कार्ड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

जेजुरी - अंगणवाडी सेविका आणि आशा या ग्रामीण नागरिक व बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका व आशा यांचे जिल्हा परिषद आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या मदतीने हेल्थ कार्ड काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

जेजुरी (ता. पुरंदर) येथे अंगणवाडी सेविका व आशा यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मार्गदर्शन करताना सुळे बोलत होत्या. या वेळी जालिंदर कामठे, दिगंबर दुर्गाडे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, सारिका इंगळे, गौरी कुंजीर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, समन्वयक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.

 अंगणवाडी सेविका व आशा यांच्याशी सुळे यांनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. मानधन वाढले पाहिले व अवांतर कामाचा ताण कमी करावा, अशा मागण्या या वेळी महिलांनी केल्या. आशा कार्यकर्तींना ग्रामीण भागात फिरावे लागते. बारामती लोकसभा मतदार संघातील आवश्‍यक त्या आशांना सायकली देण्यात येणार आहेत. या शिवाय त्यांच्यासाठी महिलांचे आजार व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी झेंडे, शेळके यांचे भाषण झाले.

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला होता. विरोधकांनी विरोध केल्यानंतर सरकारला तो मागे घ्यावा लागला. अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन माहिती भरण्यासाठी खर्च येतो. कमी मानधन, त्यात ऑनलाइनचा खर्च यामुळे अंगणवाडी सेविकांना आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. सरकारी पातळीवर या समस्या मांडल्या जातील. 
- सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: Health Card for Anganwadi workers