आरोग्य केंद्रातील यंत्रणा खडकवासल्यात ‘अशक्त’

Khadakwasala-Health-Center
Khadakwasala-Health-Center

खडकवासला - ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते. हवेलीतील खडकवासला मतदारसंघात असलेल्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नसल्याने येथील आरोग्य यंत्रणा ‘अशक्त'' झाली आहे.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण, लॅब टेक्निशियन, लेखनिक, वाहन चालक, (प्रत्येकी एक) चार परिचारिका, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका (प्रत्येकी एक) अशाप्रकारे १३ जणांचे पथक कार्यरत असते. यानुसार, खेडशिवापूर केंद्रात दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. येथे फक्त तेरापैकी फक्त पाच कर्मचारी सेवेत आहेत.

सांगरुण व खानापूर आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी आहे. ते दोन्ही कंत्राटी डॉक्टर आहेत. खानापूर केंद्रात कर्मचारी कमी आहेत. खडकवासला केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरुपी सेवेतील आहेत. एक वैद्यकीय अधिकारी आजारी असतात. दुसऱ्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार आल्याने  पाच- सहा महिन्यांपासून ते  जिल्हा परिषदेत काम करतात, परंतु त्यांचा पगार या केंद्रातून निघत असल्याने ती जागा रिक्त दिसत नाही.  येथील केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सकाळी फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com