सांगवीतील जयराज सोसायटीत आरोग्य शिबीर संपन्न

रमेश मोरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

जुनी सांगवी - येथील जयराज रेसिडेन्सी फेज १ या सहकारी संकुलात जनकल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रामकृष्ण राणे यांच्या वतीने ८ व ९ एप्रिल रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अस्थिरोग, हाडांची ठिसुळता, मधुमेह, रक्तदाब, रक्ताच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. यात सोसायटी सभासद व सोसायटी मित्र परिवारातील नागरीकांनी लाभ घेतला. तपासणी नंतर आढळणाऱ्या रोगावर रूग्णांना सवलतीच्या दरात 'हेल्थ स्पिंग फॅमिली हेल्थ एक्सपर्ट'  यांच्या कडून सेवा पुरवली जाणार आहे. असे 'हेल्थ स्पिंग'चे व्यवस्थापक प्रमुख डॉ. अभिषेक गायकवाड यांनी सांगितले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सोसायटी पदाधिकारी प्रशांत परब, पुष्पा रामटेके, दादासाहेब खोकले, भाग्यश्री लोणकर व नंदा राणे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: health checkup camp at Jairaj Society in Sangvi