Corona Vaccination: १० दिवसांत २५ हजार जणांना कोरोनाची लस देणार; आरोग्य विभागाची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

पुणे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी अद्यापही तो पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही.

पुणे : पुणे जिल्ह्यातील २४ हजार ६९१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे येत्या दहा दिवसांत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे. यानुसार दररोज सरासरी अडीच हजार जणांना ही लस टोचण्यात येणार आहे. गेल्या १९ दिवसांत १५ हजार २७६ कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली आहे.

या लसीकरणाची जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी मिळून २८ रुग्णालयांमध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. हा टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.

Indo-China Border: राफेलमुळं चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ!​

दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या आदेशानुसार दहा दिवसांत हा टप्पा पूर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे असणार आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी अद्यापही तो पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. यामुळे अजूनही जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, या लसीकरणासाठी गुरुवारी (ता.३) जिल्ह्यात २५ लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व सत्रांमध्ये मिळून जिल्ह्यात एकाच दिवसात १ हजार ९३२ आरोग्य कर्मचारी आणि ६७ कर्मचारी अशा एकूण १ हजार ९९९ जणांना लस देण्यात आली.

नवज्योतसिंग सिद्धूची पुन्हा 'ठोको ताली'!​

- लसीकरणासाठी एकूण पात्र कर्मचारी - ३९ हजार ९३७.
- आतापर्यंत लस देण्यात असलेले - १५ हजार २७६.
- लसीकरण बाकी असलेले कर्मचारी - २४ हजार ६९१.
- पूर्ण झालेल्या लसीकरणाची टक्केवारी - ३८ टक्के.
- लसीकरण शिल्लक टक्केवारी - ६२ टक्के.
- लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या टीम - ५०.

Fact Check: अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

आतापर्यंत पूर्ण झालेले लसीकरण
- आंबेगाव - ८९९
- बारामती - २०८०
- भोर - ६१९
- दौंड - ६४४
- हवेली - १५८७
- इंदापूर - ८५३
- जुन्नर - १५८५
- खेड - ९८२
- मावळ - १३१७
- मुळशी - ११०५
- पुरंदर - १११५
- शिरूर - ११२२
- वेल्हे - ३१७
- जिल्हा रुग्णालय,औंध - ५५८
- पुणे कॅंटोंमेंट बोर्ड - ३१०
- खडकी कॅंटोंमेंट बोर्ड - १८३

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health department announced that 25000 people will be corona vaccinated in 10 days