esakal | Indo-China Border: राफेलमुळं चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Rafale

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबत सध्या सीमावाद सुरू आहे.

Indo-China Border: राफेलमुळं चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बेंगलोर : एकीकडे बेंगलोरमध्ये एअरो इंडिया शो २०२१ सुरू आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वायूदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी केलेलं वक्तव्य सर्वाचं लक्ष्य वेधून घेत आहे. राफेलमुळे चीनच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने जे-२० लढाऊ विमान तैनात केलं होतं, पण जेव्हा भारताने राफेल हे फायटर विमान भारत-चीन सीमेवर तैनात केलं त्यावेळी चीन मागे हटलं आहे. 

'या सेलिब्रिटीजना लक्झरीत बसवून आंदोलनस्थळी न्या'; संजय राऊतांनी व्यक्त केलं सडेतोड मत​

आम्ही तयार आहोत
वायूदल प्रमुख भदौरिया म्हणाले की, सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. चर्चा कशी होतेय यावर पुढील सर्वकाही अवलंबून आहे. आवश्यक तेवढी फौज सध्या सीमेवर तैनात करण्यात आली आहे. संवादातून मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे. पण जर काही नवीन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. 

प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील कारचा अपघात, 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या​

सीमेवर सैन्य तैनात
पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबत सध्या सीमावाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पुरेसे सैन्य तैनात केलं आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्याने भारताची ताकद वाढली आहे. राफेलमुळे चीनच्या चिंतेत भर पडली आहे. भारत-चीन सीमेवर चीनने त्यांचे जे-२० फायटर जेट्स तैनात केलं होतं. याची दखल घेत भारतानं राफेल जेट विमान सीमेवर धाडलं आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)