पिंपरी: आरोग्य विभागाकडून हॉस्पिटलला 25 हजाराचा दंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019


हॉस्पिटल तसेच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट तयार होते. त्यात इंजेक्‍शन, सलाईन, ऑपरेशननंतरचे शरीराचे अवयव, रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बॅंडेज तसेच रुग्णालयात तयार होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे. कायद्याने या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे

पिंपरी : हॉस्पिटलमधील धोकादायक बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणे भोसरी - पुणे नाशिक रस्त्यालगतच मंकिकर मुलांचे हॉस्टिपल अॅन्ड लॅब (डॉ. काळे) हॉस्पिटलला चांगलेच महागात पडले आहे. हा कचरा उघड्यावर टाकल्याने या हॉस्पिटलकडून तब्बल 25 हजार रुपयांचा दंड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वसूल करण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

पाच वर्षांनंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातल्या महिलेची करुण कहाणी   
 
हॉस्पिटल तसेच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट तयार होते. त्यात इंजेक्‍शन, सलाईन, ऑपरेशननंतरचे शरीराचे अवयव, रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बँडेज तसेच रुग्णालयात तयार होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे. कायद्याने या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. मात्र, रुग्णालयांकडे ही यंत्रणा नाही. परंतू महापालिकेनेच शहरातील रुग्णालयांसाठी सशुल्क स्वरुपात ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शहरातील रुग्णालयांची नोंदणी करून त्यांना ही सुविधा दिली जाते. मात्र, त्यानंतरही काही रुग्णालयांकडून पैसे वाचविण्याच्या नादात हे वेस्ट कचरा पेटीत टाकला जातो. त्यामुळे शहरातील कचरा वेचकांना या सुया टोचने तसेच या कचऱ्यामुळे आरोग्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात. 

पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...​

भोसरी पुणे नाशिक रस्त्यालगतच कचरा कुंडीमध्ये आरोग्याच्या "मॉर्निंग पाहणी पथका'ने सकाळीच आठ सुमारास कचरा उचलण्यासाठी गेलेल्या सेवकांना कचऱ्यात इंजेक्‍शनच्या सुया तसेच बायोमेडीकल वेस्ट आढळून आले. त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर आरोग्य निरीक्षक तसेच सहायक आरोग्य निरीक्षकांनी या कचऱ्याची तपासणी केली असता, त्यात डॉ. काळे यांचे मंकिकर मुलांचे हॉस्पिटलच्या रिसिट तसेच औषधांच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यानंतर लगेच या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनास ही बाब कळवित या प्रकारापोटी धोकादायक कचरा उघड्यावर टाकल्याने रुग्णालय प्रशासनास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी के अनिल रॉय यांनी माहिती दिली.

पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health department fined Rs 25,000 for hospital in Pimpri