पुणे - सांगवीत आरोग्य विभागाकडून नालेसफाई

रमेश मोरे
मंगळवार, 22 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी - प्रभाग क्र 32 अंतर्गत सांगवी, नवी सांगवी परिसरातील नाल्यांच्या साफसफाई कामाला सुरूवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन नाल्यातील गाळ, प्लॅस्टीक व इतर कचरा काढण्याचे काम सध्या सांगवी परिसरात दिसून येत आहे.   

आरोग्य विभागाकडुन जुनी सांगवीतील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळेशेजारील व  शिवांजली परिसरातील नाले साफ-सफाई पूर्ण करण्यात आली असून नवी सांगवी दशक्रिया घाट, इंन्द्रप्रस्थ सोसायटी समोरील नाला साफसफाईचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

पावसाळ्यात सांगवी परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. नव्याने टाकलेल्या वाहिन्या, नालेसफाई यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी मदत होणार अाहे. स्थानिक नगरसेवक नागरीकांच्या सुचनेनुसार स्वत: लक्ष घालुन नालेसफाईचे काम पूर्ण करून घेताना परिसरात दिसत आहेत. जुनी सांगवी प्रभाग आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाले सफाईचे काम सुरू आहे.

"एम एस काटे चौक, नर्मदा गार्डेन येथील नाला साफसफाईच्या कामासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला स्थापत्य विभागामार्फत जेसीबी व अन्य साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. येत्या आठ-दहा दिवसांत सांगवी-नवी सांगवीतील नालेसफाईची कामे मार्गी लावली जातील.
- नगरसेवक हर्षल ढोरे

Web Title: health department takes initiative for cleaning of nalas in sangavi pune