आरोग्यमंत्री टोपे म्हणताहेत, खासगी हाॅस्पिटलने 100 रुपये जास्त घेतले तर 500 रुपये वसूल करा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन

पुणे : पुण्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड अपुरे पडू नयेत, यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये सरकार लक्ष देईल. देशात महाराष्ट्राने दिशादर्शक काम केलं आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ८० टक्के बेड मिळावे म्हणून दोन अधिकारी नेमले आहेत. रुग्णांचे बिल तपासले जावे म्हणून आम्ही ऑडिटेर नेमले, जर बिल वाढले असेल तर अक्षम्य गुन्हा आहे. आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी जाऊन पाहावे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खडसावले आहे.

Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

पॅकेज खासगी हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी 100 रुपये जास्त घेतले तर 500 रुपये वसूल करावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहे, जर नाही ऐकले तर गुन्हा दाखल करा असेही ते म्हणाले.  पुण्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलीये, ती खात्रीपूर्वक कमी होईल. 

ज्येष्ठांना हवीत सुविधासंपन्न जीवनशैलीची घरे

पुण्यात बेडची आज अडचण नाही. नवीन 4000 ऑक्सिजन बेड वाढवतोय, आयसीयू बेड पण वाढवतोय. आता लॉकडाऊन विषय थांबवला आहे. आता अनलॉक करू...कोरोना सोबत काही महिने जगावे लागेल, सर्व नियम अटींचे पालन करावे.

कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात येईल :  डॉ. राजेश देशमुख

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो, पण यावेळी कोरोनामुळे गणेशोत्सव पुण्यात साध्यापणाने शासन नियमाप्रमाणे साजरा केला जावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी पुणेकरांना केले.

पवार कुटुंब आयडियल 
पार्थ पवार माझे मित्र आहेत. पवार परिवार आदर्श परिवार आहे. तात्पुरता विषय आहे, तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, पवार आयडियल कुटुंब आहे, पार्थ शी बोलणं माझं झालं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Tope says if a private hospital charges more than Rs 100, recover Rs 500