esakal | Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

Ram_Currency_Note

नेदरलॅंडमधील या संस्थेत वापरल्या जाणाऱ्या नोटेवर पुढे रामाचा फोटो बरोबरच 'विश्व शांती राष्ट्र' असे लिहिलेले आहे.

Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : 'श्रीरामा'च्या नावाची नोट चलनात आहे, असं जर कोणी म्हटलं तर तुमचा विश्‍वास बसणार नाही, पण नेदरलॅंड स्थित एका आंतरराष्ट्रीय संस्थेचे चलनच चक्क 'राम' आहे. विशेष म्हणजे हे चलन पाहायचे असेल, तर तुम्हाला नेदरलॅंडला जायची गरज नाही. कारण या आणि अशा अनेक दुर्मिळ चलनांचा संग्रह पुण्यातील नरेंद्र टोळे नावाच्या अवलियाने केला आहे.

 Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी​

जगावेगळे छंद जोपासणारे पुण्यात अनेक अवलिया सापडतील. टोळे यांनी तर मीठ, जुने नाणी आणि कवड्यांपासून ते नोटांपर्यंत सर्वांचा अमूल्य संग्रह केला आहे. भारतात 1947 पासून 1 रुपयांची नोट छापू लागली. 1994 मध्ये ही नोट छपाई बंद करण्यात आली. तेव्हापासूनच्या एक रुपयांच्या छापलेल्या नोटांचे सेट त्यांच्याकडे आहेत. विविध किंमतीच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या कलाकुसर असणाऱ्या नोटा त्यांच्याकडे आहेत. तुमच्याकडे काही दुर्मिळ नोटा आणि नाणी असतील, तर तुम्ही टोळे यांच्या कर्वेनगर येथील संग्रहालयात ठेवू शकता.

पुणेकरांमध्येच अँटीबॉडीज् जास्त का? काय आहे कारण?​

कशी आहे नोट :
नेदरलॅंडमधील या संस्थेत वापरल्या जाणाऱ्या नोटेवर पुढे रामाचा फोटो बरोबरच 'विश्व शांती राष्ट्र' असे लिहिलेले आहे. तर मागच्या बाजूने कल्पवृक्ष आणि गायीचे चित्र, तसेच राम राज्य मुद्रा असे लिहिले आहे. एका राम नोटेची किंमत 500 रुपये आहे. महर्षी महेश योगी नेदरलॅंडमध्ये गेले होते. त्यांनी तिथं आश्रम सुरू केला आणि या नोटा 15 वर्षांपासून तिथे वापरायला सुरवात केली. 

टोळे यांचा संग्रह :
किती देशांचे चलन : 220 
एकूण नोटा : 60,000 
नाणी : 65,000 

विविध देशांचे चलनांचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. त्यातून दुर्मिळ, अनमोल नाणी आणि नोटांचे एक संग्रहालयच तयार झाले. रोज हे संग्रहालय पाहण्यासाठी खुले असते. 
- नरेंद्र टोळे, संग्राहक.

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image