खबरदारी, आहार, व्यायाम ही आरोग्याची त्रिसूत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

‘हेल्थ का मॉनिटर’ डीव्हीडीचे प्रकाशन; पहिल्याच दिवशी एक लाखांवर विक्री  
पुणे - ‘‘रुग्णाला बरं करणं हे डॉक्‍टरांचे आद्य कर्तव्य आहेच, परंतु त्यांना अगोदरच काळजी घ्यायला प्रवृत्त करणं हे ही तज्ज्ञांचं काम आहे,’’ असे मत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले. ‘हेल्थ का मॉनिटर’ या डीव्हीडीचे प्रकाशन रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.  

‘सकाळ माध्यम समूह -मधुरांगण’ची निर्मिती असलेल्या ‘हेल्थ का मॉनिटर’ डीव्हीडीसाठी माधवबाग, व्हीआरटी व एन. एम. कम्युनिकेशन हे प्रायोजक आहेत.

व्यायामातून आनंद मिळाला, तरच तो फायदेशीर ठरतो, असे सांगून ‘माधवबाग’चे सीईओ डॉ. रोहित माधव साने यांनी माधवबागेच्या ‘सेव्ह माय हार्ट’ या ॲपचा लाभ घेण्याचे आवाहन केले. भीती दूर सारून, आपणही मजा करा आणि मुलांनाही करूद्या, असा सल्लाही त्यांनी उपस्थित पालकांना दिला.

बालरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला धारप यांनी पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम देण्याच्या आवश्‍यकतेवर भर दिला. मनोविकार तज्ज्ञ डॉ. नीलेश नाफडे यांनी लर्निंग डिसॲबेलिटीबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, असे सांगताना गॅजेटस्‌चा अतिवापर चुकीचा असल्याचे नमूद केले. मुलांकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहायला शिका, असे आवाहनही त्यांनी केले. 

‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी सर्व मान्यवरांचे सत्कार केले. कार्यक्रमाला ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाइन’चे संतोष रासकर, ‘ढेपेवाडा’चे संचालक नितीन ढेपे, सूर्यशिबिर रिसॉर्टच्या संचालिका अलका पटवर्धन उपस्थित होते. अभिनेत्री चित्रा खरे यांनी सूत्रसंचालन केले. 
‘हेल्थ का मॉनिटर’ डीव्हीडीसाठी ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाइन’ यांनी ॲनिमेशन केले आहे, तर संगीतकार अविनाश -विश्‍वजित यांनी संगीत दिले आहे.

सवलतीत डीव्हीडी
मूळ किंमत रु. ३५० रुपये - सवलत मूल्य - रु. २५० रुपये.  (सवलत १५ दिवस उपलब्ध)

‘हेल्थ का मॉनिटर’ ही डीव्हीडी, ‘सकाळ’च्या ५९५ बुधवार पेठ येथील मुख्य कार्यालयात उपलब्ध. (सकाळी ११ ते सायंकाळी ६)  संपर्क - ९०७५०१११४२ किंवा ८३७८९९४०७६

डीव्हीडी खरेदी करणाऱ्या पहिल्या ३०० जणांना खालीलपैकी कोणतीही एक सहल विनामूल्य. (एका व्यक्तीसाठी)  
‘सूर्यशिबिर रिसॉर्ट’तर्फे ९०० रुपयांची एक दिवसाची सहल व इतरांना पाच टक्के सूट. (अधिक माहितीसाठी ९८२२०५७४८७)  
‘ढेपेवाडा’तर्फे ११०० रुपयांची एकदिवसीय सहल मोफत - (अधिक माहितीसाठी ९८२२६४०५९९)   
‘गो क्रेझी ॲडव्हेंचर पार्क’तर्फे ५५० रुपये मूल्याच्या ॲडव्हेंचर ॲक्‍टिव्हिटी मोफत.  

Web Title: health monitor dvd release