आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

पुणे - वैद्यकीय रजेचे बिल मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. 

पुणे - वैद्यकीय रजेचे बिल मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. 

तानाजी होनाजी दाते (वय ५०) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील ई क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहे. याच कार्यालयातील एका सफाई कामगाराने वैद्यकीय रजा घेतली होती. त्यासाठी त्याने वैद्यकीय रजेचे बिल मंजुरीसाठी अर्ज दिला होता. ते मंजूर करण्यासाठी दाते याने त्याच्याकडे लाचेपोटी दहा हजार रुपये आणि व्हिस्कीच्या बाटलीची मागणी केली. याबाबत त्या कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार अर्जाची शहानिशा केली. त्यानंतर पिंपरी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शनिवारी सापळा रचून दाते याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: health officer arrested by bribe