आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा: दिलीप वळसे पाटील

युनूस तांबोळी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी (पुणे) राज्यात आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची भरती होणे गरजेचे आहे. चार वर्षांत आरोग्य विभागाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

कवठेयेमाई (ता. शिरूर) येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धनच्या सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, कुसूम मांढरे, सभापती देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, विश्वास कोहकडे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. विजय गोखले, बाळासाहेब डांगे उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ""बालमृत्यू कमी करणे, कुपोषणाची कारणे शोधणे, अंधत्व निवारण करणे याबाबत आरोग्य खात्याने जबाबदारीने काम केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवा. राज्यात कर्करोगाने त्रस्थ झालेले अनेक नागरिक आहेत. त्यांना उपचाराचा योग्य सल्ला मिळाला पाहिजे.'' सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. सरपंच दीपक रत्नपारखी यांनी आभार मानले.

Web Title: Health officials fill vacancies says Dilip Walse Patil