

Gayatri Pore’s innovative health-safety project selected for the INSPIRE Award science exhibition.
Sakal
शिवणे : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘इन्स्पायर्ड ॲवॉर्ड-मानक’ कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवणे येथील विद्यार्थिनी गायत्री रमेश पोरे हिच्या ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षा यंत्र’ या प्रकल्पाची राज्य स्तरासाठी निवड झाली. खोपी (ता. भोर) येथील फ्लोरा इन्स्टिट्यूट येथे १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान हे प्रदर्शन पार पडले.