esakal | बारामतीकरांवर आणखी एक संकट, कोरोनाच्या संकटकाळातच डॉक्टर...
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंदातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक उपकेंद्रांमध्ये डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्याची प्रक्रिया गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे.

बारामतीकरांवर आणखी एक संकट, कोरोनाच्या संकटकाळातच डॉक्टर...

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर (पुणे) : बारामती तालुक्यातील १६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेमले गेलेले डॉक्टर (समुदाय आरोग्य अधिकारी) रूजू न झाल्याने आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. यामध्ये वडगाव निंबाळकर, वाणेवाडी, वाघळवाडी या तीन मोठ्या गावांचाही समावेश आहे.

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...
 
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंदातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक उपकेंद्रांमध्ये डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्याची प्रक्रिया गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी नेमणूक झालेले अधिकारी रुजू झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती तालुक्यात ५२ उपकेंद्रात आरोग्य अधिकारी रूजू होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात ३६ ठिकाणी अधिकारी रूजू झाले असून, उर्वरित १६ ठिकाणी नेमणूक होऊनही अधिकारी आले नाहीत. त्यामुळे ही पदे रिक्त आहेत. येथे नव्याने अधिकारी निवडीची प्रक्रीया होईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगीतले. 

होळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १४ गावे येतात. यामध्ये ९ उपकेंद्र आहेत. त्यातील ६ उपकेंद्रांत अधिकारी रूजू झाले आहेत. वरील ३ ठिकाणी अधिकारी नसल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. आशा सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने कामकाज सुरू आहे. तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नेमले जाणाऱ्या आरोग्य अधिकार्‍यांच्या नेमणुका तातडीने कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.