पुणे झेडपीचे कौतुक...ना उद्घाटन, ना कार्यक्रम...थेट ओपीडी सुरू 

pimpale jagtap
pimpale jagtap

शिक्रापूर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही औपचारीक उद्घाटनाची प्रतिक्षा न करता जिल्हा परिषद प्रशासनाने शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांकडून आरोग्य खात्याचे कौतुक होत आहे.       

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दोन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झालेल्या पिंपळे जगताप येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण असताना ती तातडीने वापरात आणा, अशी मागणी होत होती. मात्र, या इमारतीचे हस्तांतरण झाले नव्हते. त्यामुळे त्याची औपचारीक बांधकाम पूर्तता करून हे काम बांधकाम खात्याकडून आरोग्य खात्याकडे महिनाभरापूर्वी वर्ग झाले. दरम्यान, आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात कुठलीच उद्घाटनाची औपचारीकता न करता उपकेंद्रात ओपीडी सुरू केली.

या केंद्रात सध्या एक निवासी डॉक्टर, एक महिला परिचर, दोन आरोग्य सेविका व एक शिपाई, अशा एकूण पाच कर्मचा-यांचा फौजफाटाही रुजू करून दिला.  जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकाराबद्दल पिंपळे जगताप ग्रामस्थांकडून आरोग्य खात्याचे कौतुक होत आहे. या ठिकाणी वाढणा-या रुग्णसंख्येचा विचार करता आरोग्य उपकेंद्राची रुग्ण खाटा वाढवून त्याला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी केली. 

दरम्यान, इमारत हस्तांतरीत झाल्याने आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ ओपीडी सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपळे जगताप उपबाजारातील शेतक-यांची भविष्यातील गरज, तळेगाव दाभाडे- चाकण- शिक्रापूर- न्हावरे रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना आणि या भागातील औद्योगिकरण व नागरिकरणाची गती पाहता या उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याची मागणी दोन वर्षांपूर्वीच आरोग्य मंत्रालयाकडे केलेली आहे. तूर्तास किमान ५० खाटांचे कोविड सेंटर तरी सुरु करावे, अशी मागणी शिरुर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com