आरोग्यव्यवस्था जाणार मागे; वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता

एकीकडे केंद्र सरकार ‘राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन’च्या माध्यमातून नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्याच्या नोंदींबद्दल बोलत आहे.
Heart Health
Heart HealthSakal
Summary

एकीकडे केंद्र सरकार ‘राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन’च्या माध्यमातून नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्याच्या नोंदींबद्दल बोलत आहे.

पुणे - एकीकडे केंद्र सरकार ‘राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन’च्या माध्यमातून नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्याच्या नोंदींबद्दल बोलत आहे. पण, महाराष्ट्रात मोठ्या सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था ही तेरा वर्षे मागे घेऊन जाणारा निर्णय घेतला जातो. प्रगतिशील महाराष्ट्रासाठी ही मोठी नामुष्की असल्याची भावना वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

राज्यातील सोळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस - हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) एका रात्रीत बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला. हा निर्णय का घेतला? त्यामागची कारणे काय? याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण विभागाचे सचिव, आयुक्त आणि संचालकांकडून वारंवार संपर्क साधूनही देण्यात आली नाही. या पार्श्वभूमिवर राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी ही भावना व्यक्त केली आहे.

पुण्यातील बालरोगतज्ज्ञ आणि ‘इंडियन असोसिएशन फॉर मेडिकल इन्फॉर्मेटिक्स’चे माजी अध्यक्ष डॉ. राजीव जोशी म्हणाले, ‘राज्य सरकारने विशेषतः कोरोना उद्रेकात अनेकांनी कौतुक केलेल्या कार्यप्रणालीला थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एचआयएमएस’ व्यवस्था बंद केल्याने भरपूर समस्या निर्माण होतील. पहिली गोष्ट म्हणजे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा केसपेपरही कोणाला उपलब्ध होणार नाही. रुग्णांच्या वैद्यकीय नोंदीवर त्यांचा अधिकार आहे, हे सांगणे सोपे असते. परंतु, आता या नोंदी रुग्णाला देणे अशक्य आहे. कारण, ही संगणक प्रणाली पुढे वापरलीच जाणार नाही. डॉक्टर रुग्णांच्या भूतकाळाची माहिती पाहू शकणार नाहीत किंवा रुग्णांचे प्रयोगशाळेतील मागील अहवाल पाहू शकणार नाहीत.’

‘वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टर शिकत असतात. संशोधन करत असतात. त्यामुळे त्यांनी प्रबंधासाठी या व्यवस्थेत संकलित केलेल्या माहितीसाठी हे डॉक्टर याच व्यवस्थेवर अवलंबून आहेत, त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही,’ असेही औरंगाबाद येथील डॉ. संभाजी कदम यांनी सांगितले.

दुर्दैवाने हेल्थकेअर इन्फॉर्मेटिक्समधील निर्णय या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता घेतले जात आहेत. ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची व्यवस्थापनाविषयी माहिती असू शकते, परंतु आरोग्यसेवा माहिती हे पूर्णपणे वेगळे शास्त्र आहे.

- डॉ. राजीव जोशी

काय करता येणे शक्य आहे?

सॉफ्टवेअर कंपनीला ही माहिती ‘राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन सर्व्हर’वर स्थलांतरित करण्यास सांगितले जाऊ शकते. ही माहिती नवीन संगणक प्रणालीत वापरता येते.

काय केले पाहिजे होते?

कंपनीची सेवा बंद करताना मध्यवर्ती कालावधी असायला हवा होता, जेव्हा सध्याचे सॉफ्टवेअर हळू हळू नवीन सॉफ्टवेअरने बदलायला हवे होते, जेणेकरून कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देता आले असते. नवीन सॉफ्टवेअर आणि सिस्टीमच्या विक्रेत्याला त्यांची सिस्टीम टप्प्याटप्प्याने स्थापित करण्यास सांगितले जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com