esakal | पुणे : भोरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस 

बोलून बातमी शोधा

पुणे : भोरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस 

तालुक्यात दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुणे : भोरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोर ः तालुक्यात दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबवडे व हिर्डोशी खोऱ्यात आणि वीसगाव खोऱ्यात पावसासह वादळाची तीव्रता अधिक आहे.

हेही वाचा - VIDEO: फक्त VIP नाच ट्रीटमेंट आहे का? रेमडेसिव्हीरसाठी पुण्यातील महिलेचा हंबरडा

सकाळच्या तीव्र उन्हानंतर दुपारी तीनच्या सुमारास सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरुच आहे. वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांची  धावपळ झाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात वीज वारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले.

शेतीचे व जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेणापासून थापलेल्या गोवऱ्या, जनावरांचे रचलेले गवत, भाताचा पेंढा, कडबा याचे प्रचंड नुकसान झाले. पाऊस आणि वादळ असल्यामुळे घराच्या छपरांमधून घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे 
घरांमध्येही पाणी-पाणी झाले.

हेही वाचा - पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन

(संपादन : सागर डी. शेलार)