दमदार पावसाने बारामतीकर सुखावले

मिलिंद संगई
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

बारामती शहर - शहर व तालुक्यात सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दमदार पावसाची बारामतीकरांना प्रतिक्षा होती तसा पाऊस आज पडल्याने लोक सुखावले होते. 

सकाळपासूनच आज बारामतीत जोरदार पाऊस पडत होता. राहून राहून पावसाचा जोर वाढत असल्याने बेसावध अनेक बारामतीकर पार चिंब भिजले तर पावसाचा जोर कमी होत नसल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. मात्र अशा पावसाची नितांत गरज असल्याने आज लोक सुखावले. 

शहरात सकाळपासूनच सुरु असलेल्या पावसाने सखल भाग जलमय झाला असून अनेक ठिकाणी रस्त्यावरची खडी उखडली गेली आहे. पावसाची रिपरिप आज कायमच सुरु असल्याने अनेक बारामतीकर चिंब भिजल्याची दृश्ये पाहायला मिळाली. पाऊसच नसल्याने बेसावधपणे शाळेत गेलेले अनेक शालेय विद्यार्थीही आज पावसातून घरी जावे लागल्याने चिंब भिजून गेले होते.

Web Title: heavy rain in baramati