

Relentless Rain Revives Purandar: Karha River Flows Full, Farmers Rejoice
esakal
सासवड : पुरंदर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदी वातावरण आहे. पुरंदर किल्ला परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली असून सासवड येथील सिद्धेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. तसेच चरणावती नदीलाही पाणी आले आहे. या नयनरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी सासवड येथील संगमेश्वर मंदिरासमोरील पुलावर नागरिकांची गर्दी होत आहे.