esakal | पुढील काही तास पुण्यात 'मुसळधार' पाऊस । Rain
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील काही तास पुण्यात मुसळधार पाऊस

पुढील काही तास पुण्यात मुसळधार पाऊस

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे: पुणे आणि लगतच्या भागात १२ ते १५ किलोमीटर उंचीचे ढग आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शहर आणि परिसरात सखल भागात पाणी साठण्याची शक्यता असून, वाहतूक खोळंबणे आणि निवडक ठिकाण फ्लॅशफ्लडचीही शक्यता आहे.

हेही वाचा: मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली,वाहतुक ठप्प

अरबी समुद्रात नुकतेच विरलेल्या शाहीन चक्रीवादळामुळे ओमानच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम राज्यावरही पाहायला मिळत असून, पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईच्या रडार छायाचित्रांतून सोमवारी रात्री पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापुर, उस्मानाबाद आदी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुण्यात गुडघाभर पाणी

शहरात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडगाभर पाणी वाहत होते. सखल भागांत अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा झालेला पाहायला मिळाला. रात्री साडेआठनंतर काहीसा पाऊस थांबल्याने घरी परतण्यासाठी रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली.

loading image
go to top