Pune Rain News: पावसाचा लोंढा थेट दगडूशेठ मंदिरात, पाहा Video

heavy rain in Pune water entered in Dagadusheth halwai ganesh temple pune rain news
heavy rain in Pune water entered in Dagadusheth halwai ganesh temple pune rain news

पुणे : विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री शहराला पुन्हा अक्षरशः बुडविले. आज दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तसेच पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडुशेठ मंदिरात देखील पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दगडू शेठ मंदिरासह श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयात देखील पाणी शिरले.

पुणे शहरातील मध्यवर्थी भागात तसेच उपनगरांच्या परिसरात ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस झाल्याने रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले होते. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. शहरात पावसाचा जोर इतका भयंकर होता की, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रात्री साडेनऊ ते साडेदहा या दोन तासांमध्ये ८१ मिलिमीटर पाऊस शिवाजीनगरमध्ये नोंदला गेला.

heavy rain in Pune water entered in Dagadusheth halwai ganesh temple pune rain news
Pune Rain Update: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप

१२ किलोमीटरचा ढग

पुणे शहर आणि परिसरावर १२ किलोमीटर उंचीचा ढग रात्री असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘हा ढग रात्री पुण्यावर जात होता. तो ज्या भागातून पुढे सरकला त्या भागात मुसळधार सरी पडला.’’

का पडला मुसळधार पाऊस?

सकाळी उन्हाचा चटका वाढला. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मोठ्या उंचीचे ढग शहर आणि परिसरात आले. त्यातून रात्री मुसळधार पाऊस पडला.

heavy rain in Pune water entered in Dagadusheth halwai ganesh temple pune rain news
अधिकारी होणार भावा! पुण्यात 'MPSC'च्या विद्यार्थाचा वाहतूक पोलिसाला हिसका, Viral Video पाहाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com