

विदर्भात विजांसह
पावसाचा इशारा कायम
पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा, भंडारा, गोंदियात जोरदार सरी शक्य
पुणे : राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (ता. १५) पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि भंडारा, गोंदियात जोरदार पावसाची, तसेच उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, मुजफ्फरनगर, फतेहगड, दाल्तोंगज, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरपर्यंत सक्रिय होता. मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोड क्षेत्र कायम आहे. राजस्थानपासून गुजरात ते अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत जोरदार सरीची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी श्रावण सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता ओसरणार
झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी (ता. १४) तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय होते. ही प्रणाली झारखंडच्या रांचीपासून २० किलोमीटर आग्नेयेकडे, जमशेदपूरपासून ८० किलोमीटर पश्चिमेकडे, छत्तीसगडच्या आंबिपूरपासून २३० किलोमीटर पूर्वेकडे होती. उत्तर छत्तीसगड कडे जाणाऱ्या या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरत आहे.
----
शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२८.४---२२.२
अहिल्यानगर---२९.८---२३.७
धुळे---२९---१९.६
जळगाव---२९.४---२२
जेऊर---३१---२१.५
कोल्हापूर---२७.३---२२.१
महाबळेश्वर---१९.२---१७.५
मालेगाव---२८---२२
नाशिक---२५.८---२२.१
निफाड---२८.१---२३
सांगली---३०---२३.४
सातारा---२७.७---२२.१
सोलापूर---३१.८---२२.३
सांताक्रूझ---३०---२४.८
डहाणू---२८.५---२३.५
रत्नागिरी---३१.५---२४.४
छत्रपती संभाजीनगर---२९.५---२२.१
धाराशिव---२९.२---१९.४
परभणी---३१.४---२२.७
परभणी (कृषी)---३०.९---२१.९
अकोला---३१.२---२४.८
अमरावती---२९.४---२३.७
ब्रह्मपूरी---३२.६---२३.१
बुलडाणा---२९.५---२२.२
चंद्रपूर---३४.२---२५.८
गडचिरोली---३१.४---२२
गोंदिया---३१.४---२२
नागपूर---३२.२---२३.६
वर्धा---३२---२५
वाशीम---२९---२०.४
यवतमाळ---३०.४---२०.४
----
--चौकट--
सरासरी तापमान (अंश से.)
विभाग---किमान---कमाल
उत्तर महाराष्ट्र---१९.६---२९.८
पश्चिम महाराष्ट्र---१७.५---३१.८
कोकण---२३--३१.५
मराठवाडा---१९.४---३१.४
विदर्भ---२०.४---३४.२
---
फोटो आहे. (agnDistrict rain forecast)
फोटो ओळ : शनिवारी (ता. १५) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :
जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, भंडारा, गोंदिया.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.