
-संतोष आटोळे
इंदापूर : सध्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच उजनी धरणाने यापूर्वीच शंभरी पार करीत धोकादायक पातळी गाठत आल्याने धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वेगाने वाढ करण्यात आली असून मंगळावर (ता.19) रोजी रात्री 10:30 वाजता 75 हजार क्युसेक्स ने विसर्ग करण्यात आला आहे. तसेच यामध्ये अजून वाढ केली जाण्याची शक्यता असून भीमा नदी काठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देणेबाबत आला.