पुण्यासह उपनगरांत अवकाळी पाऊस

गोऱ्हे बुद्रुक : गारा, वारा व पावसामुळे ज्वारीच्या पीकाचे नुकसान झाले आहे .
गोऱ्हे बुद्रुक : गारा, वारा व पावसामुळे ज्वारीच्या पीकाचे नुकसान झाले आहे .

पुणे - पुण्याच्या मध्यवर्ती भागात तसेच कात्रज, सहकारनगर,सातारा रस्ता, धनकवडी, हडपसर या भागांत आज दुपारी  वीजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.  उपनगरात सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे एकीकडे दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग अजून वाढेल की काय अशी भीती त्यांना लागून राहिली आहे.  

बिबवेवाडी, घोरपडी, कोथरूड, बावधन, भेकराईनगर, कॅन्टोन्मेंट व सर्व पेठा, सिंहगड रस्ता परिसर, खडकवासला, शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अखेर दुपारी एकच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. उपनगरांतील काही भागांत वारा, वीजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. यामुळे  कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे . पावसामुळे भवानी पेठ,  हरकानगर,  सेव्हन लव्हज चौक,  नानापेठ, बावधन आदी भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पाऊस पडून झाल्यानंतर ढगाळ वातावरण होते.

खडकवासल्यात शेतपिकांचे नुकसान
खडकवासला : वारा, गारा आणि अवकाळी पाऊस यामुळे खडकवासला भागातील पिकांचे नुकसान झाले आहे.

खडकवासला परिसरात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. वारा आणि गारांमुळे आंब्याचा मोहरदेखील गळून पडला आहे. तसेच मेथी, पालक, टोमॅटो, झेंडूचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती हवेलीचे मंडल कृषी अधिकारी सुनील लांडगे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
“ गुढीपाडवा,  श्रीरामनवमी, श्रीहनुमान जयंती, अक्षयतृतीया, लग्न सराईमुळे अडीच एकरामध्ये झेंडूची लागवड केली होती.  पाडाव्यासाठी 20 किलो झेंडू तोडला होता.

पावसामुळे झेंडूची रोपे पूर्ण झोपली आहेत. तसेच आंब्याचा मोहर आणि कळी (छोटीकैरी)देखील गळून पडली आहे.असे गोऱ्हे बुद्रुक येथील शेतकरी सुशांत खिरीड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com