Pune Rains : पुण्यातल्या रामवाडीत मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

वडगावशेरी येथील गार्डेनिया सोसायटी फेज 1, शुभम सोसायटी, उज्वल सोसायटी येथे सोमवारी (ता. 21) रात्री झालेल्या पावसामुळे सोसायटीत पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

रामवाडी (पुणे) : वडगावशेरी येथील गार्डेनिया सोसायटी फेज 1, शुभम सोसायटी, उज्वल सोसायटी येथे सोमवारी (ता. 21) रात्री झालेल्या पावसामुळे सोसायटीत पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

पहाटे पाच वाजेपर्यंत सोसायटीच्या आवारात चार ते पाच फूट पाणी होते. सोसायटीच्या मागच्या बाजुला ड्रेनेज, झाडेझुडपे असल्याने मोठे मोठे साप ही सोसायटीच्या रहिवाशांनी आढळून आल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना पाठीवरून गेट पर्यंत पालकांना  पोहचवावे लागले. लिफ्ट बंद ठेवल्याने जेष्ठ व लहान मुलांना पायऱ्या चढ उतार कराव्या लागत होत्या. प्रशासनाने सोसायटीत येणाऱ्या पावसाचे  पाणी साठू नये यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था करवी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Pune yesterday