esakal | डिंभे धरण ९५ टक्के भरले; डाव्या आणि उजव्या कालव्यातून विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभे धरण ९५ टक्के भरले; डाव्या आणि उजव्या कालव्यातून विसर्ग सुरु

डिंभे धरण ९५ टक्के भरले; डाव्या आणि उजव्या कालव्यातून विसर्ग सुरु

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

घोडेगाव : डिंभे धरण ( हुतात्मा बाबू गेनू जलाशय ता.आंबेगाव) सायंकाळी साडेसहा वाजता 95 टक्के भरले. पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून रात्री कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे. नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिंभे धरणाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता १२.५० टीएमसी आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत धरणात 11.80 टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाच्या डाव्या कालव्यांमधून ५५० क्युसेक पाणी सोडण्यात येत असून उजव्या कालव्यातून 150 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आत्तापर्यंत धरण परिसरात 827 एकूण मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी धरण 99 % या दिवशी भरलेले होते.

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

गेल्या वर्षी मात्र एकूण पाऊस 812 मिलिमीटर पडल्याची नोंद आहे. डिंभे धरण भरल्यामुळे आंबेगाव, जुन्नर,शिरूर, नगर, सोलापूर या भागातील शेतीला मोठा लाभ होणार आहे. चार दिवस आदिवासी पश्चिम भागात भीमाशंकर व खोऱ्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरण साठा ७ टक्क्यांनी वाढला आहे. नदीकाठावरील नागरिकांनी विशेष काळजी घेऊन काठावर न जाण्याचे आव्हान डिंभे धरणाचे उपअभियंता तानाजी चिखले यांनी केले आहे.

loading image
go to top