पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; पाहा कोठे कोठे झाला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

पुण्यात 1951 ते 1980 दरम्यान जानेवारीत एकही दिवस पाऊस पडला नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण दिसत होते. गुरुवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पण शुक्रवारी (ता.8) दुपारी दोन तास पावसाने पुणे शहराला झोडपून काढले. दुपारी आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली होती. 

शुक्रवारी सकाळपासूनच शहराला ढगाळ वातावरणाने झाकोळून टाकले होते. त्यामुळे बहुतांश पुणेकरांना सूर्यदर्शन झाले नाही. हवेतील आर्द्रता वाढल्याने दुपारी पावसाचे आगमन झाले. शहर आणि उपनगरातही पावसाने हजेरी लावली.  

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घ्या : अजित पवार​

शहराच्या कोणकोणत्या भागात झाला पाऊस -
- शिवाजीनगर येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत 2.7 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.
- पाषाणमध्ये पावसाच्या जोरदार सर पडल्या. त्यामुळे तेथे 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
- तसेच बालेवाडी, बाणेर येथेही जोरदार पाऊस झाला. - खडकवासला, शिवणे, उत्तमनगर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग झाली.
- बिबवेवाडी परिसरात पंधरा मिनिटे जोरदार पाऊस पडला.
औंध परिसरात पाऊस सुरू
- तसेच कोथरूड परिसरातही मुसळधार पाऊस झाला आहे. 
- विश्रांतवाडी, खडकी, वाकडेवाडी, कसबा पेठ आदी भागांतही पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. 
- नगररोड, केशवनगर, मुंढवा, खराडी, घोरपडी आणि वानवडी परिसरातही अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. 

यंदा महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा होणार; पण...​

पावसाचा असाही इतिहास
पुण्यात 1951 ते 1980 दरम्यान जानेवारीत एकही दिवस पाऊस पडला नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली. पुण्याच्या हवामान इतिहासात 1948 साली सर्वाधिक म्हणजे 35.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही 23 जानेवारी 1948 रोजी 22.3 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. 

1980 ते 2009 या 29 वर्षातील माहिती हवामान खात्याकडून उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्राप्त माहितीनुसार पुण्यात जानेवारी महिन्यात सध्या 1948 नंतरचा मोठा पाऊस पडला, असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains also lashed Pune city and suburbs