Pune Rain Update : पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसासोबतच वेगानं वारेही वाहत आहेत. या पावसामुळं कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. .Video: मुंबईत AC लोकलमध्ये टीसींची अधिकृत प्रवाशांवर अरेरावी; रेल्वेचे कर्मचारी मात्र फुकटात करतात प्रवास.पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांसह नजीकच्या डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, औंध, बाणेर या उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. तसंच येरवडा, लोहगाव, वाघोली आणि खराडी, हडपसर या भागांमध्ये काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळं या भागातही काही वेळात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. .गुरुवारी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी पावसाने पिंपरी चिंचवड येथे देखील पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. जवळपास तासभर मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यांवरील सखल भागात पाणी साठले होते. अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी ग्रेड सेपरेटर, बस स्थानक, मेट्रो स्थानक या ठिकाणी आसरा घेतला..शुक्रवारी सकाळपासूनच वातावरण काहीसे ढगाळ होते. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. शहरातील निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड या मध्यवर्ती भागांसोबतच डांगे चौक, भूमकर चौक, वाकड, रावेत, भोसरी या ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. अवघ्या तासाभराच्याच पावसाने शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठलेले दिसून आले. त्यामुळे चाकीस्वारांना या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे जिकरीचे ठरत होते. तासभर जोरदार सरी बरसल्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. चार वाजल्यानंतर पुन्हा बारीक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.