Pune Rains : पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

शहराच्या पूर्व भागातील उपनगरांना गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; तर सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड भागात दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.

पुणे : शहराच्या पूर्व भागातील उपनगरांना गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; तर सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड भागात दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पुढील चोवीस तास ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता कायम आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे दुपारी देण्यात आला होता. त्याचदरम्यान सिंहगड रस्ता, पाषाण येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे वादळी वारा आणि पावसाला सुरवात होण्यापूर्वीच संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी अनेकांनी घरी परत जाण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला विरोधीपक्षाची सत्ता द्या; राज ठाकरेंचे आवाहन

शाळकरी मुले संध्याकाळी वेळेत घरी पोचतील, अशी व्यवस्था पालकांनी केली होती, त्यामुळे सातच्या आत घरात गेलेले पुणेकर सुरक्षित होते. रात्री आठ वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटाला सुरवात झाली. वाऱ्याचा वेग वाढला आणि मुसळधार सरी पडू लागल्या.

पुण्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस 

शहरात एक ते 10 ऑक्‍टोबर या दरम्यान 42.2 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र या दहा दिवसांमध्ये सरासरीच्या दुप्पट म्हणजे 92.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सरासरीच्या तुलनेत 49.9 टक्के जास्त पाऊस पडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 

उमेदवाराने थेट बाँड पेपरवर दिला राजीनामा

पावसाचा अंदाज 

शुक्रवार (ता. 11) ः ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता. 
शनिवार (ता. 12) ः मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता. 
रविवार (ता. 13) ः हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Pune