मुसळधार पावसाने शहराला झोडपले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - शहर आणि परिसराला बुधवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. पुढील चार ते पाच दिवस शहरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी पाच वाजता आकाशात ढगांची गर्दी वाढली. त्यामुळे शहरात पाच वाजण्याच्या सुमारास आकाश अंधारून आले आणि पावसाला सुरवात झाली. सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर, पाषाण, नगर रस्ता, धनकवडी, कोथरूड या भागात पावसाचा जोर मोठा होता. तेथे रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते. 

तापमानात घट 
शहर आणि परिसरात आठ दिवसांपासून 37 ते 38 अंश सेल्सिअसवर गेलेला कमाल तापमानाचा पारा 34.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे, असे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. दोन ते तीन दिवसांपासून पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा हा परिणाम आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला जाईल. 

Web Title: Heavy rains pune city

टॅग्स