
पुणे : दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह धुव्वाधार पाऊस असे वातावरण पुणेकरांनी सलग तिसऱ्या दिवशी अनुभवले. पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह शहरात पाऊस पडेल. त्यामुळे पुणेकरांनो, आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळच्या आतच पुन्हा आपल्या घरी पोचा.
शहरात शनिवारी गेल्या दहा वर्षांच्या आॅगस्टमधील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. शहरातील कमाल तापमानाचा पारा 6.7 अंश सेल्सिअसूने उसळून 34.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. याच्या दुसऱया दिवशीही शहरात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दुपारी उन्हाचा चटका लागत होता. कमाल तापमानाचा पारा 5.8 अंश सेल्सिअसने वाढून 33.8 अंश सेल्सिअस नोंदला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 23.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
राज्यात मॉन्सूनने ‘ब्रेक’ घेतला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात असलेल्या मॉन्सूनच्या ढगांची गर्दी विरळ झाली. त्याचा थेट परिणाम शहरातील तापमान वाढीवर झाला. दिवसभर उन्हाच्या चटका लागत आहे. त्याच वेळी हवेतील आद्रताही 90 टक्केच्या दरम्यान आहे. अशा स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊन शहराच्या वेगवेगळ्या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. अशा प्रकारे रविवारी सलग तिसऱया दिवशी पावसाने शहराला झोडपले.
सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, पाषाण या भागात संध्याकाळी सहा वाजण्याच्या परिसरात पाऊस सुरू झाला. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासांनी वानवडीच्या परिसरात वादळी वाऱयासह पावसाच्या मुसळधार सरींना सुरवात झाली.
सिंहगड रस्त्यावरील रहिवाशी गौरी इधाते म्हणाल्या, “दिवसभर पंखा लावून घरात बसावे लागले, इतका उकाडा होता. संध्याकाळी पाच वाजता आकाश अंधारून आले. त्यानंतरच काही वेळातच पावसाच्या सरींना सुरवात झाली. रस्त्यांवरून पावसाने पाणी पाणी वेगाने वाहू लागले. काही मिनीटांमध्येच या रस्त्यांना नदी-नाल्याचे रुप आले.”
दृष्टीक्षेपात पुण्यातील पाऊस (1 जून ते 6 सप्टेंबरपर्यंत. सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)
शिवाजीनगर ........ 623.5
लोहगाव ............. 628.8
पाषाण ............... 596.7
वादळी वार्यासह सिंहगड रस्ता परिसरात पाऊस पडत आहे.
शिवणे, उत्तमनगर, खडकवासला, नांदेड कुडजे गोऱ्हे परिसरात पावसाची जोरदार हजेरी
नगररोड, हडपसर परिसरात मुसळधार पाऊस
वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात जोरदार पाऊस वाहतूक कोंडी असून ओढे भरून वाहण्यास सुरवात झाली आहे. परिसरात मागील वर्षीप्रमाणे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.