अवघड आहे! थंडीच्या दिवसांत पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

शिवाजीनगर येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत 1.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी साडेसहानंतर शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे हवेत गारवा पसरला होता. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली.

पुणे : शहरात ऐन थंडीच्या दिवसांत शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. परिसरात काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होत आहे. गेल्या तीन, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पुढील एक, दोन दिवस ते कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाजीनगर येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत 1.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी साडेसहानंतर शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे हवेत गारवा पसरला होता. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे उत्तर व मध्य महाराष्ट्रासह नजीकच्या भागांमध्ये येणाऱ्या वाऱ्यांमधील आद्रतेमुळे राज्याच्या विविध भागात सध्या पाऊस पडत आहे.

गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने होणारी वाढ व ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. शहर परिसरात शुक्रवारी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 5.1 ते 6 अंश सेल्सिअसने वाढले. शहरात 19.4 अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे 21.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात शनिवारनंतर पुन्हा हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता
मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागासह विदर्भात विविध ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. या भागांमध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (17 अंश सेल्सिअस) महाबळेश्‍वर येथे नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता असून त्यानंतर राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
 

पुण्यात सायकलट्रॅकचा वापर नगण्यच; 82 टक्के सायकलस्वारांची पाठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Pune in Winter seasons