
पुणे-सातारा रोडवर खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे. जवळपास चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती आहे. या वाहतूक कोंडीमुळे पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे.